फेब्रुवारी २६ २०१०

समर्थ रामदास - अधिक माहिती हवी

  1. समर्थ रामदासांच्या साहित्य वर त्यांच्या पूर्वीच्या कोणत्या धार्मिक ग्रंथांचा प्रभाव/प्रेरणा/परिणाम जाणवतो ? वाल्मीकिकृत योगवसिष्ठाचा काही  प्रभाव आहे का ?
  2. दासबोध दशक सहात .... 
कोणी एके ग्रामीं अथवा देशीं । राहणें आहे आपणासी । न भेटतां तेथिल्या प्रभूसी । सौख्य कैंचें ॥ २॥ म्हणौनि ज्यास जेथें राहणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें । म्हणिजे होय श्लाघ्यवाणें । सर्व कांहीं ॥ ३॥ प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता । आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४॥ म्हणौनि रायापासूनि रंक । कोणी एक तरी नायक । त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५॥ त्यास न भेटतां त्याचे नगरीं । राहतां धरितील बेगारी । तेथें न करितां चोरी । अंगीं लागे ॥ ६॥ याकारणें जो शहाणा । तेणें प्रभूसी भेटावें जाणा । ऐसें न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७॥ ग्रामीं थोर ग्रामाधिपती । त्याहूनि थोर देशाधिपती । देशाधिपतीहूनि नृपती । थोर जाणावा ॥ ८॥ राष्ट्राचा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो महाराजा । महाराजांचाही राजा । तो चक्रवर्ती ॥ ९॥

समर्थ रामदास,  ज्या ठिकाणी कुणी  जाईल /राहील तेथील प्रमुखाशी/ राजाच्या संपर्कात राहण्याचा सला देतात. त्यांची स्वतःची   भ्रमंतीही खूप होती. समर्थांच्या साहित्यात स्वतःच्या अशा इतर (राज) प्रमुखांच्या  भेटीचे काही संदर्भ आढळतात काय ?  खासकरून तत्कालीन मुस्लिम शासकांशी त्यांच्या कुठे भेटी झाल्या होत्या काय ?

         ३. समर्थांचे भारतात नेमके कुठे कुठे जाणे झाले होते ?
         ४.  समर्थांबद्दल त्यांच्या शिष्याचे सोडून तत्कालीन इतर  कोणत्या व्यक्तिंच्या लेखनात संदर्भ आढळतात काय तसे असेल तर ते नेमके कोणते

सहज जिज्ञासा जागृत झाली म्हणून हा चर्चा प्रस्ताव . जाणकारांकडून अधिक माहिती  वाचण्यास आवडेल.

-विकिकर 

 

 Post to Feed

दुवा
चिंता करितो विश्वाची

Typing help hide