मार्च २०१०

उपकरणे -अस्थप्रग्रा (डिजीटल स्टिल कॅमेरा)

ह्यासोबत

ह्या सदरात  तुम्हाला आवडणाऱ्या उपकरणांची  अनुभवलेली माहिती मी मराठी तून देण्याचा हा प्रयत्न करीत आहे. मराठीतून तंत्रज्ञान माहिती असावी ह्या हेतूने हा प्रयत्न आहे. इथे वापरलेले शब्द शक्य तितके कार्य दर्शविणारे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दुमत असू शकेल.

(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे. )

अंकित स्थिर प्रतिमा ग्राहक म्हणजेच "अस्थप्रग्रा" (डिजीटल स्टिल कॅमेरा). मी हा विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज बाजारात तुम्ही पुढील तीन प्रकारच्या प्रतिमा ग्राहकाच्या जाहिराती बघता. १ - पंज्यात मावणारा (पॉकेट कॅमेरा), २ - एक संध (ऑल इन वन कॅमेरा) आणि ३ - भिंग बदलता येणारा डीएसेलार. जाहिरातीत दिलेली माहिती वाचून मदत होण्या ऐवजी जास्त गोंधळ होतो. पण मग एक प्रतिमा ग्राहक "प्रग्रा"(कॅमेरा)तुम्ही विकत घेता.

अस्थप्रग्रा हा बऱ्याच सुट्या भागांचा एक संच आहे. ह्यातील काही भागांच्या मर्यादा व क्षमतेचा छापील छाया चित्राशी संबंध आहे. बघूया पहिला महत्त्वाचा भाग प्रतिमा संवेदक (इमेज सेन्सर) व त्यात असणाऱ्या चित्रपेशी म्हणजे काय?

चित्रात दिसणारा कृष्ण-धवल चौकोनांचा संच हा एक सामान्य कृष्ण-धवल प्रतिमा संवेदक असून कोणत्याही वस्तूची प्रतिमा प्रत्येक छोट्या चौकोनात विभागली जाते. ह्या प्रत्येक चौकोनाला मराठीत चित्रपेशी (पिक्सेल) म्हणतात. निळ्या, हिरव्या व लाल रंगाच्या काचेच्या चौकोनातून संबंधीत रंगाचा विद्युत भार संबंधीत चित्रपेशी तयार करतात. ह्या विद्युत भाराने प्रतिमा निर्मिती प्रक्रियेतून रंगीत दृश्य प्रतिमा तयार होते.


१ - सीसीडी, २ - सीमॉस आणि ३ - प्रत्यक्षात एखादा संवेदक प्रतिमा ग्राहकात नाण्याच्या तुलनेत केवढा आहे हे समजू शकते. प्रतिमा संवेदकाचे दोन प्रकार आहेत. सीसीडी व सीमॉस. सीसीडी म्हणजे चार्ज कपल्ड डिव्हाइस ह्याचा मराठीत अर्थ प्रतिमा प्रकाशाचा विद्युत भार निर्माण करणारे उपकरण. तसेच सीमॉस म्हणजे कॉंप्लीमेंट्री मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर ह्याचा अर्थ असा की प्रतिमा प्रकाशाने निर्मित विद्युत भार नियंत्रण करणारी पद्धत ज्यात सीमॉस फेट (फील्ड इफेक्ट ट्रांझिस्टर) वापरतात. ह्याचे फायदे तोटे हा फार मोठा चर्चेचा विषय आहे. सीसीडी संवेदक प्रकारात गेली २० वर्ष सतत शोध होत आहेत तरीही उत्पादन किंमत जास्त आहे. पण सीमॉस संवेदकाचे उत्पादन सोपे व कमी किमतीत होते. दोन संवेदकातील फरक पुढील चित्रात दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. चित्र ४०१सीसीडी संवेदकाने काढले आहे व चित्र ९११ सीमॉस संवेदकाने काढलेले असून २०० टक्के मोठे करून तुलना करण्याचा प्रयत्न केला आहे.  

आधुनिक कॅमेऱ्यात ३. ३ ते ५६ दशलक्ष चित्रपेशींचे संवेदक उपलब्ध आहेत. जितक्या जास्त चित्रपेशी तितकी जास्त प्रतिमेची माहिती मिळणे शक्य आहे, व तितके मोठे छाया चित्र छापणे शक्य होते. छायाचित्राचे दोन प्रकार आहेत एक निव्वळ अंकित माहिती (सॉफ्ट) ज्याचा उपयोग फक्त संगणकाच्या दर्शकावर (मॉनिटर) दिसण्यासाठी तर दुसरा कागदावर छापील (हार्ड कॉपी). चित्राचा दर्जा चित्रपेशींच्या तपशिलाने (रिझोल्युशन) ठरतो. संगणक दर्शक सामान्यतः: १०२४ पिक्सेल लांबी व ७६८ पिक्सेल रुंदीचा असतो त्यावर दर इंचाला ७२ ते ९६ चित्रपेशी (रिझोल्युशन) दिसण्याची सोय असते. ह्याचाच अर्थ ९६ चित्रपेशी दर इंचाला (पिक्सेल पर इंच) किंवा बिंदू दर इंचाला (डॉट पर इंच) ह्या तपशिलाने १० इंच लांब ७ इंच उंच रेखीव प्रतिमा दिसू शकते. अशा प्रतिमेचे १०२४ X ७६८ = ७८६४३२ चित्रपेशी असतात. परंतु कागदावर छपाई करताना ३०० चित्रपेशी दर इंचाला / बिंदू दर इंचाला तपशिलाच्या प्रतिमेचा दर्जा चांगला असतो. त्यापेक्षा कमी तपशिलाच्या प्रतिमेतील रंग, रेखीवपणा कमी असतो व नको असलेल्या डागांची संख्या वाढते. पुढील चित्रातून हा फरक जाणवेल.

पहिल्या चित्रात संत्र्याच्या आजूबाजूला व मागे काळे डाग दिसतात तसेच प्रतिमेचा रेखीवपणा कमी झालेला दिसतो. हे छायाचित्र ४०० पेशी लांब, ३४० पेशी रुंद व ७२पेशी दर इंचाच्या तपशिलाचे आहे. तर दुसऱ्या छायाचित्र ४०० पेशी लांब, ३४० पेशी रुंद पण ३०० चित्रपेशी दर इंचाला तपशिलाचे आहे. नको असलेले काळे डाग वरच्या चित्रापेक्षा कमी असून प्रतिमा जास्त रेखीव व सुबक दिसते आहे. म्हणूनच जास्त चित्रपेशी (पिक्सेल) प्रग्राने (कॅमेरा) घेतलेल्या प्रतिमेचे सुबक, रेखी मोठे चित्र छापता येते.

अस्थप्रग्रातील संवेदकाच्या चित्रपेशी संखेने कोणत्या आकाराची छापील प्रतिमा तयार होते हे समजेल.  

दशलक्ष चित्रपेशी३०० पीपीआय तपशील छापील प्रतिमा
५. ८ x ३. ८ इंच
९. १ x ६. १ इंच
१२१४. १ x ९. ४ इंच

पुढील भागात प्रतिमा भिंग संचा विषयी (कांपौंड लेन्स) माहिती मिळेल.

(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे. )

(टीपः ह्या लेखनाची शुद्धिचिकित्सा करण्यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने शुद्धिचिकित्सा शक्य तितकी हाताने संपादन करून केलेली आहे. : प्रशासक)

Post to Feedस्लाईडशोचा अनपेक्षित फायदा
वा, उपयुक्त माहिती ....
माझा कॅनन ५३० गंडलाय.. :(

Typing help hide