८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

महाराष्ट्र टाईम्समध्ये ह्या पानावर वाचलेला मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम सर्वांना कळावा म्हणून येथे उतरवलेला आहे. (कार्यक्रमाच्या वेळा न कळल्याने अंदाजाने लिहिलेल्या आहेत. चू. भू.  द्या. घ्या.)

संमेलनाच्या सुरुवातीला २५ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता ग्रंथदिंडीचा प्रारंभ हिराबाग चौकातून होणार आहे. याच दिवशी संध्याकाळी ७. ३० वाजता गंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते होईल. २६ तारखेला संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमांची सुरुवात होईल. सांगता समारंभासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अभिनेते अमिताभ बच्चन, संमेलनाध्यक्ष कुलकणीर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ लेखिका जोत्स्ना देवधर, प्रकाशक सु. वा. जोशी, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर साबळे, शाहीर लीलाधर हेगडे यांचा सत्कार होईल.

२६ मार्च (पहिला दिवस) : सकाळी १० वाजता ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन आणि विंदा करंदीकर यांच्या कवितावाचनाच्या रेकॉर्डस दाखवणार

संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे अध्यक्षीय भाषण

दुपारचे सत्र : '२१ वे शतक आणि संतसाहित्य'वर परिसंवाद. सहभाग : उल्हास पवार, फेलिक्स मिचेडो (वसई), डॉ. किशोर सानप (वर्धा), फादर फ्रान्सिस दिब्रेटो, डॉ. सदानंद मोरे

निमंत्रितांचे कविसंमेलन : 'मराठी कविता आणि ग्रामीण वास्तव'वर परिसंवाद. अध्यक्ष : डॉ. सुषमा करोगल कथाकथन. सहभाग : विनोदी लेखक द. मा. मिरासदार, रेखा बैजल, रमा मराठे, बाबा परीट

२७ मार्च (सकाळचे सत्र) : प्रकट मुलाखत : लेखक श्याम मनोहर आणि मेघना पेठे.

दुपारचे सत्र : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक दबाव'वर परिसंवाद. सहभाग : डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. जब्बार पटेल, संजय राऊत, अवधूत गुप्ते.

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर

मुलांशी संवाद :

'मनोरंजनाच्या नादात आजच्या बालसाहित्यातील मूल्यभान हरपत चालले आहे'वर परिसंवाद. अध्यक्ष : डॉ. न. म. जोशी. 'साहित्य संस्था आणि कालानुरूप अपेक्षित बदल'वर चर्चा.

संध्याकाळचे सत्र : 'माध्यम तंत्रज्ञान आणि मराठी भाषा'वर परिसंवाद. रात्री 'आनंदयात्रा' हा सांस्कृतिक कार्यक्रम

२८ मार्च (समारोप) : सकाळच्या सत्रात रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन.

'महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर करण्याची सक्ती करणे काळाची गरज आहे' यावर परिसंवाद. सहभाग : न्यायमूर्ती चंदशेखर धर्माधिकारी, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मनोहर जोशी, विनोद तावडे.

'कथा हा खरोखरच गौण वाङ्मय प्रकार आहे का? ' आणि 'साता समुदापलीकडील मराठी लेखन' यावर परिसंवाद.

दुपारच्या सत्रात 'मराठी साहित्यातील नवे भान, नव्या वाटा'वर डॉ. नरेंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद.