श्रावण

श्रावण

क्षणात उजळीत क्षणात झाकोळीत

श्रावणभास्कर हा

क्षणात सरसर क्षणात भुरभूर

श्रावणसर हि

क्षणात मंद क्षणात कुंद

श्रावणझुळुक हि

क्षणात चमके क्षणात लपे

श्रावण चांदणी हि

क्षणात हले क्षणात डुले

श्रावणवेल हि

क्षणात तरल क्षणात विरल

आठवण तुझी हि