मनोगतचा फाँट!

माझ्या माहितीप्रमाणे मनोगतवर युनिकोड वापरले आहे. (अवांतरः डायनॅमिक युनिकोड असा काही फॉन्ट प्रकार आहे का?)
मी उत्सुकतेपोटी मनोगतवरचा एक लेख ब्राउझर मधून कॉपी केला आणि MS Word २००७ मध्ये पेस्ट केला. तेव्हा मला फाँट मध्ये Mangal हा फाँट दिसला व मराठी अक्षरे दिसली. म्हणून मी नवीन  word processor चालू करून तिथे Mangal हा फाँट घेऊन टाईप केले. पण त्यावेळी मराठी अक्षरे उमटली नाहीत. ह्या अनुषंगाने मला काही खालील प्रश्न पडले आहेत.

१. मनोगतचा फाँट हा युनिकोडपेक्षा वेगळा आहे काय?
२. बरहा सारखे सॉफ्टवेअर वापरून मराठी टाईप करता येते. पण असे काही सॉफ्टवेअर न वापरता MS Word  मध्ये युनिकोड वापरून मराठी टाईप करता येईल काय?
३. मला जर मराठी भाषेत एखादी वेबसाइट बनवायची असेल तर युनिकोड कसा वापरावा लागेल? (इच्छा तर आहे पण माझे व्याप सांभाळून करणे मला जमणार नाही  )

फाँटसंदर्भात मी अतिशय अडाणी माणूस आहे. मला ह्याबद्दल जास्त जाणून घ्यायला आवडेल. माझी प्रशासकांना विनंती आहे की जर काही हरकत नसेल व मनोगतबद्दल काही सेन्सेटिव्ह (मराठी शब्द आठवत नाही) माहिती उघड होत नसेल तर ह्यावर जास्त प्रकाश टाकावा. तसेच इतर अनुभवी मनोगतींनी त्यांच्याकडे युनिकोड संदर्भात असलेली माहिती द्यावी.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी युनिकोड बद्दल सोप्या भाषेत माहिती पोचावी व इंटरनेटवर आपल्या मराठी भाषेसाठी योगदान वाढावे ह्या हेतूने मी हा विषय येथे चर्चेला टाकला आहे.

लेखात काही चुकले असल्यास अथवा कमीजास्त झाले असल्यास क्षमा असावी.