काळा पांढरा

लोकसत्ता चाळता चाळता हा लेख वाचला.

लोकरंग काळा पांढरा

लेखकाने काळा पैसा कुठून येतो आणि कुठे जातो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरित अविर्भाव हा काळापैस अर्थव्यवस्थेला उपकारक आहे असे सांगणारा वाटतो. उदा -

" ...
जेव्हा जगाला मंदीचा झटका बसला, तेव्हा भारतातील उद्योगपती, व्यापारी,
बिल्डर-कॉन्ट्रॅक्टर्स यांनाही तो बसला. बॉलीवूड आणि क्रिकेटलाही बसला.
दीड वर्षांपूर्वी अशी भाकिते केली जात होती की, भारतीय अर्थव्यवस्था हा
धक्का सहन करू शकणार नाही. ते भाकित मुख्यत: अधिकृत अर्थयंत्रणेकडे पाहून,
बॅलन्स शीट्स् पाहून व बँकिंग व्यवहार पाहून केले गेले होते. त्यानुसार ते
बरोबर होते.
तरीही भारताची अर्थव्यवस्था सावरली आणि अर्थमंत्री पुन्हा
८-९ टक्के आर्थिक वाढीच्या दराची चर्चा करू लागले! पहिल्या सहा महिन्यांत
अर्थव्यवस्थेला बसलेला ‘सात रिश्टर’चा धक्का कमी कमी होत गेला आणि आता तर
आयपीएलने सिद्ध केले की, ते मायाविश्व विकत घ्यायलाही कोटय़वधी/अब्जावधी
रुपये आहेत आणि ते पाहायला जाणाऱ्यांनाही महागडी तिकीटे परवडत आहेत.
त्यासाठी फ्लॅट स्क्रीन टीव्ही सेट्स् विकले जात आहेत आणि सेलेब्रिटी जग
पंचतारांकित जीवनशैली जगत आहे.
याचे मुख्य कारण तो सर्व काळा पैसा-
देशात व विदेशात ठेवलेला- परत अर्थव्यवस्थेत आला आहे. त्या पैशानेच मंदीचा
धक्का पेलला आणि महा-उलथापालथीपासून अर्थव्यवस्था वाचवली.
... "

म्हणजे अमेरिकादी देशात जास्त काळा पैसा नाही म्हणून त्यांना मंदीचा धक्का पेलला नाही का?

यात लेखकाने सांगितले आहे की काळापैसा हा रोख स्वरूपात असतो. बँकेत (स्विस) ठेवायचा तर बँक व्याज द्यायच्या ऐवजी फी घेते वगैरे.

मला असे वाटत असे की सगळे व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून होऊ लागले की काळ्या व्यवहारांचे प्रमाण आपोआप घटेल. पण दुसरी समांतर व्यवस्था तयार होईल अशी शंकाही आहे.

तुम्हाला काय वाटते, काळा पैसा असावा (किंवा त्याला पर्याय नाही) की नसावा?