गुलकंद

  • ताज्या गावठी/ गावरान भडक लाल रंगाच्या गुलाब पाकळ्या
  • साखर
  • मोठ्या तोंडाच्या काचेच्या निर्जंतुक बरण्या
५ मिनिटे
खाण्यावर अवलंबून!

गावठी गुलाबांच्या पाकळ्या वेगळ्या करून त्या व्यवस्थित धुवाव्यात, टॉवेलने हलकेच टिपाव्यात व त्यांना एक रात्रभर सावलीत पसरून वाळवावे.

त्या पूर्ण कोरड्या झाल्या पाहिजेत. काचेच्या मोठ्या तोंडाच्या निर्जंतुक बरणीत अर्धा इंचाचा गुलाब पाकळ्यांचा थर, त्यावर अर्धा इंच साखरेचा थर असे करत करत बरणी भरू द्यावी. झाकण घट्ट लावावे. आणि रोज उन्हात काही आठवडे  ठेवावी. आतील साखर विरघळली पाहिजे. अधून मधून बरणीला हालवावे, ज्यामुळे गुलाबपाकळ्या व साखर एकमेकांमध्ये मिसळायला मदत होईल. काही आठवड्यांनी (उन्हाच्या तीव्रतेवर अवलंबून) जॅमसारखा गुलकंद तयार झालेला दिसेल! गुलकंद तयार झाल्यावर त्याला उन्हातून बाहेर काढून घरात ठेवावे. 

साखर व गुलाब पाकळ्यांचे प्रमाण सम असावे.

गुलकंदात अधिक स्वादासाठी वेलदोडे, रोझ इसेन्स घालतात. तसेच आयुर्वेदिक गुणांसाठी प्रवाळपिष्टी घालतात. 
काहीजण गुलाब पाकळ्या थोड्या चुरडून घेतात. 
काका