मराठी कवितेची बदलती भाषा

मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने,
संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी १ मे रोजी एक विशेष कार्यक्रम
आयोजित केला जातो.

ह्या वर्षी, शनिवार दि० १ मे २०१० रोजी सायंकाळी ५.३० ते
७.३० ह्या वेळेमध्ये

मराठी कवितेची बदलती
भाषा

ह्या विषयावर एक परिसंवाद
आयोजित केला आहे. ह्या परिसंवादात हेमंत जोगळेकर, डॉ० नीलिमा गुंडी, डॉ०
मनोहर जाधव व सलील वाघ हे कवी सहभागी होणार आहेत.

अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध
कवी व समीक्षक प्रा० वसंत आबाजी डहाके असतील. ह्या विशेष कार्यक्रमासाठी
आपण अवश्य उपस्थित राहून सहभागी व्हावे अशी विनंती आहे.



कार्यक्रम पत्रिका :


चहापान
प्रास्ताविक : प्रा० प्र०ना०
परांजपे
स्वागत-परिचय

विषय मांडणी : श्री० हेमंत
जोगळेकर, डॉ० नीलिमा गुंडी, डॉ० मनोहर जाधव, श्री० सलील वाघ

अध्यक्षीय समारोप : प्रा० वसंत
आबाजी डहाके

आभार प्रदर्शन

कार्यक्रमाचे स्थान :
श्रीमती ना०दा० ठाकरसी महिला
विद्यालय, पदव्युत्तर विभाग, महर्षी कर्वे रस्ता, पुणे येथील सभागृह.
(सूचना : विधी महाविद्यालयाकडून
येणार्‍या व्यक्तींनी कृपया, प्रवेशद्वार क्र० २ने (स्वाद उपाहारगृह
चौकातून उजवीकडे वळून) आत यावे.

आपले,

आनंद काटीकर, कार्यवाह

प्र०ना० परांजपे, अध्यक्ष

मराठी अभ्यास परिषद

१ शीतल सहनिवास, ४६/४ एरंडवन,
प्रभात रस्ता (गल्ली क्र० १४), पुणे ४११ ००४.