तात्काळ मदत हवी आहे - प्रोस्टेट कॅन्सर (उपचार आणि खर्च)

माझ्या एका अमेरीकन दोस्ताला प्रोस्टेट कॅन्सर अगदी सुरूवातीच्या अवस्थेत असल्याचे दोन महिन्यापुर्वी निष्पन्न झाले होते. अमेरीकेतला खर्च काहीच्याकाहीच असून त्याच्याकडे इन्शुरन्स नसल्याने चौकशी करण्यातच इतका वेळ गेला आहे. त्याचा कॅन्सर आता दुसऱ्या स्टेजमध्ये पोहोचला आहे. भारतात उपचार करून घेणे श्रेयस्कर ठरेल का यावर आता आमच्यात विचार चाललेला आहे. या कॅन्सरच्या प्रकारावर भारतात उपचार उपलब्ध आहेत का? असल्यास त्यांची जितकी जमेल तितकी माहिती आणि साधारण खर्च कितीसा येईल वगैरे कोणास सांगता आले तर अनंत उपकार होतील. या साध्यासरळ दोस्ताला गमावण्याचा विचारही सहन होण्यापलिकडचा आहे.