गिलक्याचे भरीत....

  • पाव किलो गिलके
  • एक कांदा
  • ५,६ पाकळ्या लसुण
  • हिरवी मिरची ,हळद, मिठ आवडी नुसार
  • थोड आल
  • कढीपत्त्ता
  • हिंग, मोहरी
  • खायचा सोडा
  • दाण्याचे दोन चमचे कुट
२० मिनिटे
एका व्यक्तीसाठी

प्रथम गिलके स्वच्छ धूऊन स्वच्छ पुसून वाफवून घ्यावे. वाफवतांना पाण्यात थोडा खायचा सोडा टाकावा म्हणजे गिलके अधिक मऊ होतात. वाफवलेले गिलके गार झाल्यावर ते बगडित ( दगडी वा लाकडी वाडग्याच्या आकाराच भांड) भरताच्या वांग्यान सारखे रगडून आवडी नुसार मिठ टाकून एक जिव करून घ्यावे त्यात एक हि गाठ राहणार नाही ह्याची दक्षता घ्यावी म्हणजे दाताखाली कांद्या ऐवजी गिलक्याची गाठ येणार नाहि.

                  हिरव्या मिर्चा, लसुण, आणि थोड आल ह्याची मिक्सर मधून बारिक पेस्ट करून घ्यावी त्यात कढीपत्ता असल्यास त्याची दोन तीन पान देखिल फिरवली तर छानच. कांदा चिरून बारिक करावा,

                   स्टोव्ह वर गॅस वर कढईत तेल टाकून तेल तापू द्यावे. त्यात कढिपत्त्ता तेल तापल्यावर प्रथम टाकावा , मग फोडणीचे सर्व जिन्नस (मोहरी, हिंग) टाकावे . तडतडत मोहरी फुटली की त्यात मिरची लसणाची पेस्ट टाकावी तीचा थोडा रंग बदलल्यावर कांदा घालावा. कांदा परततांना थोडाच लालसर होऊ द्यावा, हळद टाकावी, मग त्यात गिल्क्याचा रगडा , दाण्याचे कुट घालून व्यवस्थित खाली वर परतून घ्यावे. गॅस कमी करून मंद आचेअवर ५ ते १० मिनिट ठेवावे (झाकण ठेवू नये). थोडी कोथिंबिर भुर भुरून खायला पोळी बरोबर अथवा पराठ्या बरोबर खायला घ्यावे.

(आपल्या आवडीनुसार ह्यात दही सुद्धा टाकून खाता येते.)

दाण्याच्या कुटामुळे गिलक्याचे (पाणचटपणा हा घरचा शब्द ) सुटणारे पाणी कुटात जिरून छान चव लागते.

(थोड सणसणित असल्यास अधिक चांगल)

(ह्याच प्रमाणे दुधी भोपळ्याचे पण भरीत करता येते.)

आई......