कोकणात फिरायला जाणे आहे!!

२८ जून!! हि तारीख मी कधीही विसरू शकत नाही होऽऽऽ! हाच.. हाच तो दिवस ज्या दिवशी मी जाहिरपणे माझे स्वातंत्र्य घालवून बसलो (की उभा राहिलो? बघा कसा गोंधळ होतोय  !!) आणि त्याबद्दल लोकांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या!
हो त्या दिवशी माझे लग्न झाले!  

तर सांगायचा (खरं म्हणजे विचारायचा) मुद्दा हा की ह्या वर्षी आमच्या लग्नाला ३ वर्षे पूर्ण होत आहेत आणि आम्हाला २ दिवस कोंकणांत फिरायला (अलिबाग/काशीद/दिवेआगार/श्रीवर्धन!! ह्यापैकी एक) जायचे आहे. फिरायला जाणारे - मी, माझी बायको आणि आमची १ वर्षाची मुलगी.

तर मनोगतवर कोणी कोकणवासीय असतील / कोणाला कोंकण फिरण्याचा अनुभव असेल तर मार्गदर्शन करावे.

१. मी पुण्याहून जाणार आहे. कोणता मार्ग सोयीचा पडेल?
२. ह्या वातावरणात कुटुंबासमवेत कोंकणांत जाणे सोयीचे आहे काय?
३. राहण्यासाठी व खाण्यापिण्यासाठी कोणते ठिकाण चांगले आहे? (आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत. मासे फक्त काचेच्या पेटीतच बघतो  )
४. जर हा काळ जाण्यास चांगला असेल तर कृपया घरगुती निवासाची सोय असलेले पत्ते / दूरध्वनी क्रमांक द्यावा. मी MTDC चा पण पर्याय खुला ठेवलेला आहे.