जून २३ २०१०

लाह्यांचा उपमा! ( सुशिला)

जिन्नस

  • ज्वारीच्या लाह्या
  • एक बारिक चिरलेला कांदा
  • बारिक चिरलेला टमाटा
  • कढी पत्ता
  • बारिक चिरलेल्या ६म हिरव्या मिरच्या
  • शेंगदाणा कुट
  • चवीसाठी साखर
  • बारिक चिरलेली कोथिंबिर
  • मेथी दाणा पावडर, मोहरी

मार्गदर्शन

प्रथम मापी २ पावशेर ज्वारीच्या लाह्या घेऊन त्या पाण्यात ५ मिनिट भिजवून चाळणीवर नितरत ठेवा. मधल्या वेळात कांदा , मिरची, व टमाटा बारीक चिरून घ्या. आता कढईत फोडणीसाठी तेल टाकून गॅसवर गरम करायला ठेवा. तेल तापल्यावर त्यात कढीपत्ता व मेथी दाणा पावडर टाका, मोहरी टाकून ती तडतडल्यावर त्यात कापलेल्या मिरच्या घाला. मिरच्या रंगपालटायला लागल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा लालसर झाल्यावर बारीक चिरलेला टमाटा घालून दोन मिनिट टमाटा वाफू द्या. टमाटा कचरट झाल्यावर त्यात भिजवलेल्या लाह्या टाकून त्या परतून घ्या . आता चवीसाठी थोडी साखर व आवडीच्या प्रमाणात मीठ घालून कढईतील लाह्या पुन्हा एकदा खाली वर परतून घ्या. आता त्यात थोडं दाण्याच कूट घाला आणि पुन्हा खालीवर करून कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर ५ मी. वाफवा . नंतर थोडी चिरलेली कोथिंबीर त्यावर भुरभुरून गरम गरम , चटपटीत उपमा ताटलीत खायला वाढून घ्या.

* आपली आवड असल्यास त्यावर थोडा चाट मसाला टाकावा एक वेगळीच चव येते.

* हाच उपमा साळीच्या लाह्या वापरून अथवा मुरमुरे वापरून सुद्धा करता येतो.

टीपा

* आवडीनुसार थोडा चाट मसाला वरतून भुरभुरून पण छान लागतो.

* हाच उपमा साळीच्या लाह्या व मुरमुरे वापरून पण करता येतो.

* बाजारातील वस्तुंपेक्षा पचावयास हलके.

माहितीचा स्रोत

अहो आईच आणखीन कोण?

Post to Feedछान
खरच .....
नाव
मलाही नाही आवडलं पण.....
हबका..
धन्यवाद!

Typing help hide