सुविचार..

आजच वाचनात आला. ईंग्रजीतून होता, मी माझ्या कुवतीप्रमाणे मराठीत मांडत आहे. तो सुविचार असा होता -

ज्याला माहित नाही अन त्याला माहित नाही त्याला माहित नाही - तो मुर्ख आहे..

----- त्याच्या पासून दूर रहा.

ज्याला माहित नाही अन त्याला माहित आहे की त्याला की त्याला माहित नाही - तो सरळमार्गी आहे..

---- त्याला शिकवा.

ज्याला माहित आहे अन त्याला माहित नाही की त्याला माहित आहे - तो निद्रिस्त आहे..

---- त्याला जागवा.

ज्याला माहित आहे अन त्याला माहित आहे की त्याला माहित आहे - तो सत्पुरुष आहे..

---- त्याचं अनुकरण करा.

माणसांचं सरळ सरळ चार विभागात वर्गिकरण केलंय. मला असं वाटतं यातला प्रत्येकी थोडा थोडा भाग आपल्या सगळ्यांत असतो. थोडं स्वतःला विचारून बघितलं तर लक्षात येईल. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा..