कोंडलेले मौन

कोंडलेले मौन

काल माझे डोके माझ्यावर चिडले होते
कारण मी मनाला मुक्त सोडले होते

भ्रमण विसरून थांबली होती धरती
कदाचित तिला आपले संवाद आवडले होते

तिच्या त्या खोट्या-खोट्या रागातही
तिचे खरे-खरे प्रेम दडले होते

गडबडीत मी अधुरी सोडली कविता
तर मन माझ्यावर किती बिघडले होते

तुझ्यापर्यंत पोचल्यावर झाली कविता
माझ्या कागदावर शब्द मुके पडले होते

आधी ते शांत होते आणि आता मी अबोल
माझ्यात कोंडलेले मौन मात्र ओरडले होते

दु:खात चिडून तिने, जरी हृदयाचे दार बंद केले
माझ्या डोळ्यांना, तिच्या डोळ्यांचे मार्ग सापडले होते

"नाही, नको आता मला हे दु:ख माझे" असे
म्हणून मनाने या पुढचे शब्द खोडले होते

-- मयुरेश कुलकर्णी