दालचिनी चिकन विथ युनिक राईस

  • राइस साठि:
  • १/२ किलो आखा बासमती तांदुळाचा शिजलेला मोकळा भात
  • मोहरि १ टि स्पून खरडलेली, ओवा १/२ टि स्पून खरडलेला
  • पुदिना व कोथिंबिर चिरलेला प्रत्येकी अर्धी वाटी, २ मध्यम आकाराच्या सिमला मिर्चि उभे पातळ काप करुन
  • हिरवी मिर्चि ३ उभे काप करुन, पांढरी मिरी पुड १/२ टि स्पून
  • ओलिव ऒइल ४ टि स्पून (उपलब्ध नसेल तर गोडेतेल चालेल) ,१ लिंबाचा रस, मीठ चविनुसार
  • चिकन साठी:
  • चिकन ५०० ग्रॆम (ड्रमस्टिक, तंगड्या असल्यास उत्तम )
  • ३ दालचिनी, ३ लवंगा, ३ हिरवे वेलदोडे, मिरॆ ५ ते ६ , शहाजिरे १ टि स्पून
  • १ मोठा कांदा स्लाईस केलेला , जिरे पावडर २ टि स्पून, हिरव्या मिरच्या २ उभ्या कापून, आल १ इन्च उभे काप करुन
  • लसूण ८ पाकळ्या उभे काप करून, दही २ वाटि, कोथिंबिर थोडीशी सजविणे साठि, तेल आश्यकते नुसार
४५ मिनिटे
४ ते ५
भात :
प्रथम तांदुळ उकड्वुन घ्यावा तो परातीत मोकळा व गार करुन घ्यावा. एका बाउल मधे वरिल भातासाठी दिलेले....(भात सोडुन) बाकि सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावे. आता हे ड्रेसिंग भाता मधे हाताने मिक्स करावे. भात तयार आहे.
चिकन:
जाड बुडाच्या किंवा नोनस्टिक भांड्यात तेल गरम करून त्यात दालचिनि, लवंगा, वेलदोडे, मिरे, शहाजिरे ची फ़ोडणी करुन मग स्लाईस केलेला कांदा भुरा होइसतोपर्यन्त परता. आता चिकन त्यात घालुन खरपुस लालसर होइस तो पर्यन्त परता. मग त्यात जिरे पावडर, चिरलेल्या मिरच्या, कापलेले आल लसुण घालुन जरा वेळ हलवा. मग सगळ दहि, मिठ घालुन मस्त पैकी शिजवा...(जरुर वाटलि तरच १/२ कप पाणि घाला). झाकण लावुन चिकन टेंडर होइसतोपर्यंत शिजवा. अधुन मधुन परतत रहा जेणे करुन खालि लागणार नाहि.  कोथिंबीर घालुन परता. चिकन तय्यार आहे.
सर्व्ह करताना डिश च्या मध्यभागी चिकन व त्या बाजुने तयार भात वाढावा. लगेचच ताव मारावा.
भाता मधे ओवा, मोहरि, पांढरी मिरि, मिर्चि घातल्याने भात चांगलाच तिखट पण चविष्ट होतो त्या मुळे चिकन जास्त मसालेदार बनविले जात नाहि. 
चेन्ज म्हणून काहितरि वेगळे ट्राय करायची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठिच आहे हि रेसिपि.
टि वि.