झाझिकी

  • १ काकडी
  • ७ ते ८ लसूण पाकळ्या
  • एका पेराएवढं आलं
  • मीठ चवीनुसार
  • घट्ट दही
  • बरोबर खाण्यासाठी व्हाइट ब्रेड
३० मिनिटे
४ ते ५ जणांसाठी

दही घट्ट नसेल तर थोडा वेळ फडक्यावर टाका. जर ग्रीक दही मिळाले तर फारच उत्तम, ते एकदम घट्ट असते.
काकडीचे साल काढून घ्या आणि किसा. त्यात थोडे मीठ घालून ठेवा म्हणजे काकडीला पाणी सुटेल. हे पाणी काढून टाका. काकडी पिळून पाणी जितके काढता येईल तितके चांगले.
लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरा. आले किसून घ्या. एवढे होईपर्यंत काकडीला परत पाणी सुटलेले दिसले तर ते परत पिळून काढून टाका.
काकडीच्या किसात किसलेले आले, बारीक चिरलेला लसूण घाला. दही घाला आणि मिक्स करा. चव घेऊन हवे असल्यास अजून थोडे मीठ घाला.
झाले की तय्यार! व्हाइट ब्रेड बरोबर झक्कास लागते ही झाझिकी...
जोडीला ऑलिव्हज, चीज आणि गोल्डस बेक असेल तर आणखीच छान...

झाझिकी हा ग्रीक मधील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहे.

त्सेंटा आजी