मुलांना मनाप्रमाणे का वागता येत नाही?

मी अनन्या. मी 'मनोगत'ची नवी सभासद आहे. मी कालच माझं नवीन खातं उघडलं. मला मनोगत खूप आवडलं. मी ४थीत आहे. बाकीचे लोक, जे मनोगतचे सभासद आहेत, ते मनोगतवर आपापले प्रश्न लिहितात. मी पण तसे प्रश्न लिहिणार आहे, कारण मला तसे प्रश्न पडतात. त्यामधलाच एक प्रश्न मी खाली लिहिला आहे. --
१) मुलांचे पालक मुलांना शाळेत घालतात. काही मुलांना शाळा खूप आवडते. पण काही मुलांना मात्र शाळेत अजिबात रस नसतो. त्यांना वेगळच काहीतरी आवडत असतं. त्यांना त्याच्यातच रस असतो. त्यांच्या पालकांना जर ही गोष्ट लक्षात आली नाही, तर समजू शकते. पण जरी लक्षात आली, तरी ते त्यांच्या मुलाला/मुलीला शाळेतून काढत नाहीत. याउलट, काही ठिकाणी उलटं असतं. मुलांना शाळा खूप आवडत असते, पण त्यांचे पालक त्यांना शाळेत घालत नाहीत. उलट त्यांना कामाला लावतात. असे का? मुलांना आवडत असणारी गोष्ट, मग ती शाळा असो, किंवा दुसरं काहीही. मुलांना ते कोणी करू का देत नाही?
काही घरांमध्ये असं नसतं. माझ्याही घरात नाही. पण बऱ्याच घरांमध्ये असतं. म्हणून मी हा प्रश्न लिहिला.

धन्यवाद!