कॉफी

कॉफी

कधी काळी आणि कडू
कधी गोरी आणि गोड
सकाळ, दुपार, संध्यकाळ
कधीही मला तिचीच ओढ
किती आले किती गेले
तिला नाही कोणाची तोड
कधी लाडात येते कधी ठस्कावते
अशी तिला निराळीच खोड
कधी म्हणते दुधात बुडव
कधी म्हणते स्वतंत्रच सोड
कधी डोक्यातच जाऊन बसते
कधी फक्त ओठांशीच जोड
कधी स्वस्तात पटते
कधी म्हणते मोठी नोट मोड
कधी न विचारता देऊन जाते सगळं
कधी करावी लागते डोके-फोड
कधी मजेत, आरामात बसण्यासाठी उशी
तर कधी कोसळत्या जिवनाला टेकवण्यासाठी लोड
अशीच आहे कॉफी माझी
आधी लिही म्हणते, आणि मग म्हणते सगळं खोड

--मयुरेश