आम्ही पण जगलो होतो

आम्ही पण जगलो होतो

त्याने मला दिली बासरी सोनेरी
मी माझं जीवन-संगीत वाजवलेलं

त्याने दिली लेखणी मला मी
मन कवितेत लिहिलेलं

त्याने हातात दिली तलवार त्याची
मी माझं जग लढवलेलं

त्याने मिठीत घेतलं मला मी
माझ्या कर्त्याचं प्रेम स्विकारलेलं

कदाचित जीवनाचा अर्थ इतकाच असवा की:
कधी आम्ही पण हसलो होतो
कधी आम्ही पण वाढलो होतो
आम्ही आमच्या लढाया लढलो होतो
कधी आम्ही पण जगलो होतो

-- मयुरेश कुलकर्णी