का टिकून राहावे मुन्नीबाईने?

मनोगतावर लेखनाची शीर्षके मराठी नसल्यास प्रशासनाद्वारे अनुक्रमणिकेतल्या शीर्षकाचे मराठीकरण केले जाते. उदा. नुकतेच लगी रहो मुन्नीबाई चे  मुन्नीबाई, टिकून राहा करण्यात आले.

अनेक लेखकांना, वाचकांना  अशी मराठी शीर्षके हास्यास्पद तरी वाटतात किंवा अशी शीर्षके बदलण्याने लेखनस्वातंत्र्याचा अपमान होतो आहे असे तरी वाटते.  पण ते मुद्दे वेगळेच आहेत.

माझ्यामते शीर्षकाच्या मराठीकरणामागचा हेतू नक्कीच उदात्त आहे. पण अशा तकलादू किंवा कॉझ्मेटिक वाटणाऱ्या उपायांमुळे मराठी समृद्ध होणार आहे का? होणार असल्यास कशी? नसल्यास का नाही? मराठीच्या वापराबद्दलचा असा अट्टाहास मराठीच्या निरोगी वाढीसाठी  कितपत योग्य किंवा अयोग्य आहे? का बरे टिकून राहावे मुन्नीबाईने?

मते मांडावी, ही विनंती.

जाता-जाता
ह्या चर्चेमुळे शीर्षकांबद्दलचे धोरण बदलावे/बदलेल अशी अजिबात आशा/अपेक्षा नाही.