हिंदूर

मिलिंद फणसेंची अप्रतिम सिंदूर आणि आसपासच्या समाजात साचत चाललेली समृद्ध अडगळ यांची मनात गल्लत झाल्याने उमटलेले हे काही वेडेवाकुडे

नि:शब्द होत गेलो, मजबूर होत गेलो
हिंदू वाचुवाचूनी हिंदूर होत गेलो

ठिणग्या विझून गेल्या, पिकल्या जरी मिशाही
हसले पुन्हा नेमाडे मी धूर होत गेलो

धारा न अमृताच्या पानेच ही सहाशे
डोळ्यात नीज येता मगरुर होत गेलो

ही कोसलाबिढारे वाचून पाठ होती
'हिंदू' जुन्या बाजारी -  मी शूर होत गेलो

स्मरणातुनी  पुसेना पुसता कथा 'खंड्या'ची
काहीच वाचवेना, मी दूर  होत गेलो