कॅनडा आणि भारत - हा फरक आहे.

काही दिवसांपूर्वी मला ई-मेलवर एक इंग्रजी लेख प्राप्त झाला त्याचा मराठी गोषवारा.

कॅनडात घडलेली एक घटना:
कॅनडाच्या एअर फोर्स सिक्युरिटी मधली एक १९ वर्षीय युवती नाटो लष्करी तळाकडे जाणाऱ्या रस्त्याची टेहेळणी करीत होती. तिला दुर्बीणीतून एक माणूस त्या रस्त्याच्या कडेला खणताना दिसला. तिनी त्याला दुर्बीणवाल्या बंदुकीतून गोळी घातली. नंतरच्या तपासात असं आढळून आलं की तो तालीबानचा हस्तक होता नि त्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी बॉम्ब पुरण्याचं काम करत होता. त्याच रस्त्यावरून अर्ध्या तासानी कॅनडाच्या सैनिकांचं गस्तीपथक जाणार होतं. त्या स्फोटानी अनेक सैनिक ठार झाले असते नि कित्येकजण जखमी झाले असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या युवतीनी ७२५ यार्डांवरून (म्हणजे फुटबॉलच्या सात मैदानांपेक्षा २५ यार्ड ज्यास्त अंतरावरून) गोळी झाडली होती. तो मनुष्य बॉम्ब पुरण्यासाठी वाकला असताना तिनी गोळी झाडल्यामुळे गोळी त्याच्या पार्श्वभागाला लागली व शरीरातून आरपार जाऊन बॉम्बला लागली नि बॉम्ब फुटला. त्या माणसाचे तुकडे तुकडे झाले. 
कॅनॅडियन एअर फोर्सनी इतराना प्रेरणा मिळावी म्हणून त्या युवतीची पोस्टर्स काढून तिला प्रसिद्धी दिली नि त्यांच्या पद्धतीप्रमाणे तिचा सत्कार केला.
हे झालं कॅनडात.

वरच्यासारखी घटना भारतात घडली तर काय होईल त्याचे काही अंदाज:
१) (घटना काश्मीरमध्ये घडली तर) हरताळ घोषित केला जाईल नि हिंसक निदर्शनं होतील.
२) नागरी हक्क संघटना चौकशीची मागणी करतील.
३) (घटना गुजरातमध्ये घडली तर) तीस्ता सेटलवाड म्हणतील की तो माणूस प्रातर्विधीसाठी रस्त्यावर बसला होता. आणि गोळीबाराचा आदेश दिल्याबद्दल मोदींवर खटला भरतील.
४) मृत व्यक्तीच्या सन्मानार्थ हुसेन उघड्या पार्श्वभागाचे चित्र काढतील. "द हिंदू" हुसेन यांच्या कलेची नि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वाहवा करतील.
५) बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, प्रणव रॉय आणि इतर काही जण पार्श्वभागावर गोळी झाडणं योग्य आहे का यावर आठवडाभर चर्चा करतील.
६) (घटना यूपीमध्ये घडली तर) मायावती मृत व्यक्ती दलित होती असं जाहीर करतील नि तो मेला त्या ठिकाणी स्वतःचा पुतळा उभारतील.
७) ज्यानी गोळी झाडली त्याच्याविरुद्ध, पार्श्वभागावर गोळी झाडून विकृत आनंद मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जनहितयाचिका दाखल करून कोणीतरी गोळी झाडणाऱ्याला कोर्टात खेचील.
८) गोळी घालणाऱ्या नेमबाजाला खातेनिहाय चौकशी नि निलंबनाला तोंड द्यावं लागेल.
९) पंतप्रधानांना त्या रात्री झोप लागणार नाही नि ते मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना मदत म्हणून पंतप्रधाननिधीतून १० लाखांची नुकसानभरपाई जाहीर करतील.