ऑक्टोबर २०१०

प्रेम करून लग्न करतात ...!!
 
जेव्हा तो प्रेम करतो 
तेव्हा त्याच्या खिशात चंद्र असतो 
जेव्हा  ती प्रेम करते
तेव्हा तिच्या मनात एक स्वप्न असते              
दहा पेंशाचे फुटाणे खाता खाता 
दोघांचे एक गाणे असते 

चला  इथपर्यंत पाऊलवाट सापडली 
स्वर्ग आता हाकेवर आहे 
आमचे प्रेमतर 
सात जन्माची ठेव आहे !!     

तो तिच्या डोळ्यात बघतो 
एक छान गाणे गातो
ती डोळे मिटते 
त्याच्या गाण्यात हरवून जाते 

इथपर्यंत गाडी येता येता 
ती अवघड वाट संपून जाते 
प्रेमाचा शेवट लग्नात होतो 
हु.sss...शः....!! 
आई बाबांचा अवघड प्रश्न 
आपण चुटकीसरशी सोडवला 
ह्याच आनदात दोघे असतात 
संसाराचे गाणे ठेका धरून गात असतात ....!!   

सुटीचे दिवस संपतात 
नि हा कामावर जाऊ लागतो  
त्याने टाटा करत्ताना 
तिचा जीव कासावीस होतो 
असे बरेच टा ssss   टा होतात 
हळूहळू जीव कासावीस होणे कमी होत जाते 
मग तो टा ssss   टा करीत नाही 
नि तिचा जीवपण फारसा कासावीस होत नाही 

मग कधीतरी त्याला आपल्या टा ssss  टाचे स्वप्न पडते  
जीव कासावीस होण्याचे स्वप्नं
तिला झोपेतून जागे करते.....
मग तो पण हसतो 
ती पण मस्त हसते 
नि आपल्या खुळेपणाची गंमत वाटते ....  

     मधूनच कधीतरी भांडण होते
ती डोळ्यातून पाणी काढते 
त्याचेपण काळीज फाटते
मग हा  नरमाइने म्हणतो  
जो पर्य्यंत भांडण होत नाही   ?  
शप्पत सांगतो ...
तो पर्यंत ते खरे प्रेमच नसते ...!!
ते प्रेम असते ट्रायल-- सिम्पल 
भांडणानंतर जो प्रेम करतो 
तो खरा प्रेमिक असतो 
भांडणानंतर जी प्रेम करते 
ती खरी प्रेमिका असते !!
मग तो हसतो 
मग ती पण हसते 
डोळ्यातील पाणी नकळत पुसते 

मनात म्हणते ...
जे भांडून प्रेम करतात 
ते प्रेमिक असतात कोठे ..?
ते असतात नवरा -  बायको  
सात जन्माचे जोडीदार.....!! 
की  दावेदार ....?

जे प्रेम करून लग्न करतात 
शप्पत सांगा ..
त्यांचे काय होते ..???

Post to Feed

अनुभव जास्त लिहायला हवेत, असं वाटतं.
प्रतिसाद

Typing help hide