अक्रोड खजुर केक

  • कणीक -२५० ग्रॅम
  • सोडा -२ टी स्पुन
  • अंडी -४
  • लोणी -१ १/४ कप
  • साखर -२ कप
  • अक्रोड तुकडे -३/४ कप
  • खजुर बिया काढुन -४०० ग्रॅम
१ तास
काहीही ..

ओव्हन ३५० सें ग्रे. ला प्री हीट करावा ..

केक बेकींग च्या ट्रे ला तेलाचा हात लावून कणकेचे कोटींग करून घ्यावे..
.
त्यामध्ये खजुराचा लगदा एकत्र करून घ्यावा..
एका मोठ्या भांड्यात लोणी + साखर +अंडी फेटुन घेणे..[मिक्सर मध्ये फेटले तरी चालेल]
या मिश्रणात कणीक+खजुर चे मिश्रण घालून चमच्याने फेटून घेणे..
आता अक्रोडा चे तुकडे घालून पुन्हा एकदा ढवळावे..
 ओव्हन मध्ये ३० ते ३५ मिनिट बेक करावा..
[केक भाजल्याचा वास आल्यावर म्हनजे २५ मिनिटानी एकदा चेक करून पाहावा.. बेक झाल्यावर ओव्हन च्या बाहेर काढून थंड करावा..]

वरील प्रमाणानुसार केल्यास हमखास मस्त केक तयार होतो..

आई