पाव बटाटा पॅटीस

  • चिंचेची चटणी १ ते २ वाटया (चिंच, गुळ, तिखट, मिठ, धणे, जिरे पुड वापरुन केलेली.)
  • सॅण्डविच ब्रेड १ लादी
  • उकडलेले बटाटे ४ ते ५
  • डाळीचे पिठ(बेसन) आवश्यकते नुसार
  • तिखट, हळद, मिठ, चविनुसार
  • ओवा चिमुटभर, खायचा सोडा २ चिमटी
  • २ हिरव्या मिरची चे बारिक तुकडे
  • तळण्यासाठी तेल
३० मिनिटे

१) चिंचेची चटणी करून घ्या.

२) बटाटे उकडून मॅश करून घ्या व त्यात तिखट, हिरवी मिरची चे तुकडे, हळद, मीठ, व चाट मसाला घालून छान एकत्र करा. कोथिंबीर उपलब्ध असल्यास टाकू शकता.

३) बेसन मध्ये मीठ, तिखट, हळद, जिरे पूड, ओवा व पाणी घालून घोल तयार करा. त्यात खायचा सोडा व गरम तेलाचे मोहन २ चमचे घालून छान पैकी फेटून घ्या.

४) ब्रेड स्लाइस वर तयार बटाट्याचे सारण लावा. तर दुसरे स्लाइस वर चिंचेची चटणी लावा. एक मेकांवर ठेवून मधोमध कापून त्रिकोणी आकार द्या.

५) घोल मध्ये बुडवून गरम तेलात दोन्ही बाजूंनी तळून घ्या.

६) गरमा गरम पॅटीस मधोमध कापून कच्चा कांदा व मिरची बरोबर सर्व्ह करा.

 

  • बटाट्याचे सारण मध्ये तुम्हाला आवडेल तो मसाला व घालून वेगळेपण आणू शकता.
  • चिंचेची चटणी पॅटीस मध्ये आत घातल्याने बाहेरुन चटणी बरोबर खायची गरज भासत नाही.
  • चिंचेची चटणी- चिंच भिजवून त्याचा कोळ काढून घ्या. त्यात आवश्यकते नुसार गूळ साखर मीठ धणे जिरे पूड घालून गूळ वितळे पर्यंत उकळवा. चमकदार पणा आला की झाले.

एका दुकानात खाल्ले होते. म्हटल आपण घरी करून पहावे.