वृद्धाश्रमातील ते खिन्न डोळे !!

[कोठल्याशा वृद्धाश्रमात गेलो. नि करून  दृश्य बघून 
त्यांच्या डोळ्यातील  खिन्नपणा बघून मन उदास उदास झाले. 
तेच शब्दात.....]
 
 
वृद्धाआश्रामातील कितीतरी डोळे लागलेले असतात 
रविवारी संध्याकाळी मुलांच्या भेटीसाठी  
आतुर झालेले असतात
किती कासावीस होतात   ही म्हातारी माणसे ??
घशाला कोरड पडते 
देव पाण्यात ठेवतात 
[मनातल्या मनात ...]
प्रार्थना करतात ....!
त्यांनी यावे म्हणून 
 
कुठे चळकण   आवाज झाला 
तर उत्तेजित होतात त्यांची मने ....
आले असतील..? 
तरारतात त्यांची मने 
नातवंडे सोबत असतील 
हसत खेळत येतील
मी त्यांना काय खाऊ देणार ...?
मी घेईन  मुका माझ्या बबडीचा  
तिच्या उजव्या गालाचा ..!
शहारतात प्रचंड ..!!
कसे छान स्वप्ने बघतात....
 
वृद्धाश्रमातील आजोबा वाट बघत बसतात 
खिडकीशी डोळे बांधून 
शिणून ...शिणून जातात 
आज रविवार ना ??
राशिभविष्य बघितलेय 
मनोकामना पूर्ण होतील 
असे लिहिलेय ना .[?]
मग कशी नाही येत ...अजूनही 
संध्याकाळची पाखरे घराकडे जायची ...
कधीच थांबली आहेत......! 
मग माझी पाखरे 
आता कधी येणार...? 
संध्याकाळ तर  संपून गेलीय ...
 
अरे जाऊद्यारे  आम्हाला आमच्या  घरी 
आमच्या  मुलाबाळात 
शेवटचा श्वास घ्यायला ..!!
वृद्धाश्रमातील ते खिन्न डोळे 
वाट बघत बसतात 
जातात थकून 
नि हलकेच डोळे घेतात मिटून .....!!