चाकवताची भाजी

  • १ मोठी चाकवताची जुडी
  • ३ चमचे तुरडाळ शिजवलेली
  • तेल
  • मीठ
  • दाण्याचे कूट
  • १ चमचा कांदा लसूण मसाला (घाटी मसला)
  • ५-६ लसूण पाकळ्या
  • १ चमचा जिरे
  • गरम मसाला पावडर
  • १/२ वाटी पावट्याच्या शेंगा सोलून काढलेले दाणे
२० मिनिटे
३ जण

चाकवताची भाजी स्वच्छ खुडून आणि धुऊन घ्यावी. नंतर बारीक चिरून घ्यावी. लसूण व जिरे एकत्र ठेचून घ्यावे.

एका पातेल्यात तेल गरम करून त्यात ठेचलेले लसूण व जिरे यांची फोडणी करावी.नंतर त्यात  कांदा लसूण मसाला (घाटी मसाला) घालून चांगला मंद आचेवर परतावा. नंतर त्यामध्ये शिजवलेली तुरडाळ, चिरलेली चाकवताची भाजी व पावट्याच्या शेंगा सोलून काढलेले दाणे व मीठ टाकावे. परत  थोडा वेळ परतावे. थोडे पाणी घालून भाजी शिजू द्यावी.

ही भाजी लगेच शिजते. नंतर त्यामध्ये २ चमचे दाण्याचे कूट घालावे व भाजी अजून ५ मिनिटे शिजू द्यावी. शेवटी भाजी शिजत असतानाच गरम मसाला घालून रवीने थोडी घोटून घ्यावी व एक उकळी येऊ द्यावी. भाजी जास्त पातळ करू नये.

गरम गरम चपाती बरोबर खूपच छान लागते ही भाजी.

नाही.

आई