बनाना पुरी

  • केळी १ ते २ पिकलेली
  • गव्हाचे पीठ आश्यकते नुसार
  • मैदा किंवा बारिक रवा २ चमचे
  • वेलची पुड १/२ चमचा
  • पीठीसाखर चविनुसार
  • दुध अर्धी वाटि
  • मिठ चिमुट्भर
  • तेल किंवा तुप आवश्यकते नुसार
२० मिनिटे

१) सर्वप्रथम केळी व दूध एकत्र मिक्सर मधून फिरवून घ्यावीत.

२) त्यात एक चिमूट मीठ व वेलची पूड व केळ गोडीला चांगले नसेल तर थोडी चवीनुसार पिठीसाखर घालून घ्यावी.

३) त्यात २ चमचे मैदा किंवा रवा व मावेल एवढी कणीक घालून पीठ घट्टसर मळा. तेलाच्या हाताने मळून घ्या.

आता छोटे गोळे करून. घ्या.

४) कढईत तेल किंवा तूप तापायला ठेवा. पोलपाटावर लाटिला कडईतले थोडेसे तेल लावून पुरी लाटून घ्या

५) आणि तापलेल्या तेलात किंवा तुपावर दोनही बाजूंनी खरपूस तळा.

६) गरम पुरीवर मस्त ताव मारा.

 

  1. ह्या पुरी गरम गरम जास्त छान लागतात.
  2. लहान मुले चविनं खातात.
  3. केळि फारच जास्त काळी पडली कि खावत नाहित. अशा वेळेस त्या केळ्याच्या पुरी करु शकता.

माझी माय.....आई