घुट्ट - उडिद डाळीची आमटी

  • पाउण वाटी उडीद डाळ
  • एकुण पाव वाटी मुग आणि तुर डाळ
  • ४ / ५ तिखट मिरच्या
  • ५ / ६ पाकळ्या लसुण
  • मीठ
  • १ चमचा जिरे
  • ३ चमचे किसलेल सुक खोबर.
  • २ चमचे तेल व फोडणीचे सहित्य
१५ मिनिटे
३ / ४ जण

प्रथम वर नमुद केलेल्या प्रमाणात डाळ घेउन, कुकर मध्ये छान शिजवून घ्या. आणि घोटून आमटी साठी तयार करून घ्यावी.  

नंतर मिरच्या आणि लसूण वाटून घ्याव्या.

कढई मध्ये  आधी खमंग फोडणी करावी, त्यासाठी २ चमचे तेल घेउन त्यात योग्य प्रमाणात मोहरी, हिंग, हळद घालावी.

मग त्यामध्ये मिरची आणि लसुण याच वाटण घालाव.

१  मिनिटांनंतर त्यात घोटून घेतलेली डाळ व २ /३ वाट्या पाणी घालाव.

एकी कडे किसलेल खोबर आणि जिरे वटून घ्यावे आणि ते वाटण व चवी नुसार मीठ आमटी मध्ये घालावे.

आमटी छान खळखळ उकळू द्यावी आणि आता आपण तयार आहोत, मस्त झणझणीत आमटी चा स्वाद घेण्यासाठी.

  1. गडद हिरव्या रंगाच्या घाव्या- ह्या मिरच्या जास्त तिखट असतात, जर पोपटी रंगाच्या मिरच्या असतील तर त्या जास्त घ्याव्या.
  2. या आमटी मध्ये जरा जास्त पाणी घालाव आणि थंडीच्या दिवसामध्ये / घोघो पाउस पडत असताना, या आमटी मधल वरच वरच पाणी सुप सारख प्यायला खुप मज्जा येते. गरम, तिखट आणि स्वादिष्ट.
आई