जानेवारी १० २०११

बायको : नागपुरी तडका

बायको : नागपुरी तडका

थोडीशी पगली, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥१॥ 

सलवार घाल म्हनलं तं नववारी घालते
कपाळाच्या मंधामंधी गोल कुंकू लावते
टिकल्या-मिकल्या लावाच्या फ़ंदात पडत नाही
गळ्यामंधी गुंजीभर सोनं मिरवत नाही
थोडशी येडपट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥२॥ 

सिनेमा पाहू म्हनलं तं भागवतात जाते
माह्यासाठी मुठभर शिरनी घेऊन येते
मास-मच्छी-अंडीले हात लावत नाही
तरी बाप्प्पा तीले काही देव पावत नाही
थोडीशी भोळसट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥३॥ 

सार्‍यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते
कवाकवा पानी पिऊन तशीच झोपी जाते
सडासारवन, धूनंपानी, अभय सारं करते
पहाटपासून रातपावतर मरमर मरते
थोडीशी कष्टीक, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ....॥४॥ 

                                              गंगाधर मुटे
-------------------------------------------------
शीरनी = प्रसाद, सायको = Psycho
-------------------------------------------------

Post to Feed

तुमची "बायको "....
माझी "बायको"
बायको : नागपुरी तडका
धन्यवाद.
थोडीशी कष्टीक-
कवितेचे रूप प्रातिनिधीक.

Typing help hide