खारे शंकरपाळे

  • १ वाटी डाळीचे पीठ (बेसन)
  • २ वाट्या मैदा+२ चमचे रवा
  • २ मोठे चमचे दही किवा अर्धी वाटी ताक
  • १ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा हळद,
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा ओवा
  • १ चमचा धनेजीरे पूड
  • १ मोठा चमचा ड्राय बेसल लिव्ज
  • चवीनुसार मीठ
  • तळणीसाठी तेल
दीड तास
१ पोळ्यांचा डबा भरून

 वरील सर्व पदार्थ एकत्र करा. २ चमचे तेलाचे मोहन घालून घट्टसर भिजवा.
१५-२० मिनिटे झाकून ठेवा. नंतर पोळी लाटून, शंकरपाळे काता आणि मध्यम आचेवर तळा.

हे शंकरपाळे जास्त पटकन होतात, कुटायला लागत नाही, मेहेनत कमी असे लक्षात आले म्हणून ही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी..

माझे पाक-प्रयोग