दम कोंबडी

  • कोंबडीचे पाय ४... हि हि [चिकन लेग पीसेस ४] किंवा ६ ड्रमस्टिक्स
  • आलं लसुण पेस्ट ४ चमचे
  • सुक्या लाल मिरच्या पाण्यात भिजवुन त्याची पेस्ट (आवडीप्रमाणे)
  • मिठ चविनुसार
  • गरम दुध १/२ वाटि
  • केशर २ चिमटि
  • दहि १ वाटि
  • क्रिम १/२ वाटि.. नसेल तर फ़्रेश क्रिम घरचे चालेल
  • मगज ३ चमचे (टरबुजाच्या बिया) नसतील तर चारोळे वापरा.
  • खसखस ४ ते ५ चमचे
  • काजू १० ते १२
  • तिखट पेस्ट चवीनुसार (तिखट पाण्यात भिजवून)
  • हळद १/२ चमचा
  • १/२ चमचा दालचिनी पूड
  • एक चिमटी लवंग पूड
  • १ चमचा वेलदोडा पूड
  • १/४ चमचा जायपत्री पूड
  • १/२ चमचा मिरपूड
  • अमूल बटर १ पॅकेट
अडीच तास

१) गरम दुधात केशर भिजवून ठेवा.

२) चिकन स्वच्छ धुऊन घ्या. मग त्याला लिंबूरस, २ चमचे आलं लसूण पेस्ट, सुकी लाल मिरची पेस्ट, मीठ चोळून १ तास बाजूला ठेवा.
---------------->

३) दही, क्रीम, उरलेली आलं लसूण पेस्ट, मगज खसखस काजू पेस्ट, तिखट पेस्ट, हळद, केशर वाले दूध हे सर्व मिक्स करा. नंतर त्यात दालचिनी पूड, लवंग पूड, वेलदोडा पूड, जायपत्री पूड, मिरपूड मीठ चवीनुसार घालून छान मिक्स करा.
---------------------->

४) आता हि तयार पेस्ट मेरिनेटेड चिकन ला चोळून परत १ तास बाजूला ठेवा.
-------------------------->


५) १ तासा नंतर जाड बुडाच्या भांड्यात हे चिकन घेऊन त्यात बटर टाकून त्यावर ऍल्युमिनिअम फ़ोइल लावून वर घट्ट झाकण लावून जाळावर जाळी ठेवा. जोरात जाळावर ५ मिनिटे ठेवा चिकन.. चांगला ताव आला की मंद जाळावर १५ ते २० मिनिटे शिजवा. --------------------------->
      


६) २० मिनिटा नंतर झाकण उघडून पाहा...काय सुरेख रंग आला आहे...
---------------------->


७) मस्त बाउल मध्ये काढून सर्व्ह करा.
-------------------------------->

                                                                                                                                     
  <-------------------------------

  • मगज (टरबुजाच्या बिया) नसतील तर चारोळे वापरा, खसखस, काजू, तिखट, हळद, दालचिनी, लवंग, वेलदोडे, जायपत्री, मिरे एकत्र मिक्सर मध्ये वाटले तरी चालेल.
  • खसखस बारीक वाटली जात नाही ति चांगली वाटली जावी या साठी जराशी तव्यावर शेकून १/२ तास आधी थोड्याश्या गरम पाण्यात भिजत घालावी काजू बरोबर.
  • अमूल बटर नसेल तरी चालेल..घरचे ताजे लोणी हि चालेल.
  • काजू खायची ज्यांना बंदी आहे ते लोकं काजू च्या बदल्यात बदाम वापरू शकतात. चवीत विशेष फरक पडत नाही.
  • चिकन जाळावर शिजवताना भांड्याच्या खाली जाळी किंवा तवा जरुर ठेवा म्हणजे चिकन खाली लागणार नाही.
माझी माय.....आई