फेब्रुवारी १४ २०११

व्हलेन्टाईन डे च्या शुभेच्छा.. सर्वानाच!

प्रेम..नुसत्या उच्चारानिशी अंगावर रोमांच फुलवणारा जादुई शब्द ! 
व्यक्ती बदलली की प्रेमाचे संदर्भही बदलतात. कोणासाठी मातृप्रेम  हे सर्वश्रेष्ठ तर कोणासाठी देशप्रेम . कोणाला सत्तेचे प्रेम आंधळे  बनवते तर कोणाला पैशाचे प्रेम... कोणी दर दिवसाला बदलणारी गर्लफ्रेंड हीच प्रेमाची अभिव्यक्ती मानतो तर दुसरीकडे 'जिच्यावर मनापासून प्रेम केले अश्या प्रेमिकेचा दुर्दैवी अंत झाल्यावर तिच्या आठवणीवर  उरलेले आयुष्य काढणारा प्रेमिकही आपल्याला भेटतो. पण एक मात्र नक्की, आपण सगळे  'प्रेम' या संकल्पनेवरच  मनापासून प्रेम करत असतो.

त्यातून आज तर काय, जगभरातील 'प्रियकर-प्रेयसीला' त्यांच्या प्रेमाचे जाहीर प्रदर्शन करायचे license  देणारा दिवस.. जिकडे पाहावे तिकडे कसे गुलाबी वातावरण तयार झाले आहे. सगळ्या सार्वजनिक बागा आणि जागा  तरुणाईने  भरून आणि बहरून गेल्या आहेत. ' I LOVE YOU'  किंवा 'मी तुझी साथ जन्मभर सोडणार नाही' अशा आणाभाका चोहिकडे ऐकू येत आहेत. (त्यातल्या किती निभावल्या जातात त्याचे संशोधन करायला वेळ कुणाला आहे इकडे? ).  बरयाच विवाहोत्सुक जोड्यांनी लग्नबंधनात अडकण्यासाठी आजचाच पवित्र(?) मुहूर्त निवडलाय. dinner ला कोठे जायचे, आपल्या प्रिय व्यक्तीला भेट काय द्यायची, याचे प्लॅनिंग अगोदरच झाले आहे. एखाद्याच्या मनात जर गिफ्ट विषयी confusion असेलच चुकून, तर मोठमोठे shops आहेत की सज्ज तुमची ही छोटीशी समस्या दूर करायला.. हा खिसा तेवढा जड़ असला की झाले..  

वरील सर्व वाचून 'हिला प्रेमाची allergy आहे का ' असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविकच आहे. पण खरं सांगू का, मला allergy ही प्रेमाविषयी नसून प्रेम साजरे करण्याच्या प्रकाराबद्दल आहे. इतक्या हळुवार, नाजूक भावनेचे जाहीर प्रदर्शन करण्याची खरोखरीच किती गरज आहे? ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच्यापर्यंत ही भावना पोचली की पुरेसे नाही का? आणि गिफ्ट चे म्हणाल तर तुमचे शाश्वत प्रेम हेच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठे गिफ्ट नाही का? म्हणजे काहीच गिफ्ट देऊ नका असे नाही.. पण केवळ  त्याच्या  किमतीवरून तुमच्या प्रेमाची खोली नाही ना मोजली जाऊ शकत...तेव्हा गिफ्ट देताना त्या व्यक्तीच्या भावनांचा विचार सर्वात आधी..

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'partner' खेरीज इतरही माणसे आहेत हो आपल्या जीवाभावाची! ज्यांनी स्वतःच्या असंख्य इच्छा-आकांक्षा बाजूला सारून तुम्हाला परिस्थितीची जाणीव न करू देता वाढवले ते आई-बाबा, ज्यांनी तुमच्यासाठी स्वतःला मिळालेल्या chocolate चा अर्धा तुकडा राखून ठेवला ती तुमची भावंडे, ज्यांनी तुम्हाला कठीण प्रसंगात साथ दिली ते तुमचे शेजारी, तुम्हाला शिकवलेले शिक्षक.. फार गरज आहे हो या सगळ्यांना तुमच्या प्रेमाची.... तुम्ही ते करत नसाल असे नाही, पण त्याची कबुली त्या व्यक्तीकडे देऊन तर बघा. त्यांच्या डोळ्यातील अश्रू खूप काही देऊन जातील तुम्हाला.. आपले आयुष्य ज्यांनी ज्यांनी सुंदर केले त्यांना आपण बाकी काही देऊ शकत नसलो तरी त्यांच्याविषयी वाटणारी आपुलकी, कृतदन्यता व्यक्त करण्यासाठी या दिवसासारखा दुसरा दिवस नाही असे मला तरी वाटते. 

तेव्हा तुम्हा सर्वांना मनापासून 'Happy Valentines Day....!!!' 

Post to Feedआपलं म्हणणं पटलं.
मनापासून आवडल आणि पटल.

Typing help hide