काही लोकं का अशी असतात...

काही लोकं... का अशी असतात...
मोठे असून सुद्धा, लहान असल्यासारखे वागतात...
जगात राहून सुद्धा जगावेगळी वागतात..... 
आपल्यात असूनही आपल्यात नसतात...
वर वर एक तर मनात दुसरंच दडवतात...
सगळं कळत असून पण न कळल्यासारख वागतात .. 
काही लोकं... का अशी असतात....
देशात राहूनही देशद्रोही काम करतात...
स्वतःचा सोडून देशाचा विचार करतात...
जबाबदारी घेऊन पण बेजबाबदारपणे वागतात ..
काही लोकं... का अशी असतात...
मनाला वाटेल तश्या गोष्टी करतात, त्याचे परिणाम भोगाताना मात्र अंग काढून घेतात .. 
समोर खड्डा दिसत असून, आनंदानं खड्ड्यात उडी मारतात .. 
नको म्हटलं काही तरी तेच तेच पुन्हा करतात ..
काही लोकं... का अशी असतात....
तोंडावर शिव्या देऊन गुपचूप मदत करतात....
वेड घेऊन पेडगावला जातात 
कामापुरते संबंध ठेवतात, आणि काम संपल्यावर दर्शन दुर्लभ करतात 
तोंडावर कौतुक आणि पाठीमागे नावे ठेवतात ....
काही लोकं अशी का असतात........
स्वतः काही न करता दुसरयाला मात्र फुकट सल्ले देतात
समोर अवघड वाट दिसताच तेथूनच माघार घेतात....
समोरच्यावर अगदी जीवापाड प्रेम करतात.........
खरच, 
काही लोकं अशी का असतात........
-- कवी दांड्या, दादया, चंद्या, केलाल, भु. क