' अमन संध्या'

सस्नेह नमस्कार 
ज्ञान प्रबोधिनी डोंबिवली विस्तार केंद्रातर्फे दि. १४/८/२०११ रोजी  असीम फौंडेशन, पुणे  यांचा 'अमन संध्या '   हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाविषयी थोडक्यात सांगता येईल ते असे की ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेचा विद्यार्थी असलेला सारंग गोसावी हा गेली १० वर्षे जम्मू- काश्मीर चा अभ्यास करत आहे. तिथले सामाजिक /धार्मिक /राजकीय वातावरण,

दहशतवादाची छाया, भारतीय लष्कराविषयी असलेली नाराजी  या सगळ्याबद्दल प्रसार माध्यमातून आपल्या समोर जे चित्र रंगवलेल असत, त्यामुळे  आपल्या सर्वांच्या मनात काही विशिष्ट कल्पना असतात.

पण त्या  किती खर्या आहेत, तिथला खरा प्रश्न काय आहे? या सगळ्याबद्दल सारंग 'अमन संध्या ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याला आलेले अनुभव कथन करतो. जम्मू व काश्मीर बाबत अनेकांच्या मनात   असणाऱ्या ठराविक गृहितकांच्या प्रतिमा पुसण्याची, उर्वरित भारतीय आणि सामान्य काश्मीरी जनता  यांच्यामधे संवादाचे भक्कम पुल उभारण्याची 'असीम फौंडेशन ' ही एक चळवळ  आहे. सामान्य माणसाचे सामान्य माणसासाठीचे विकासाप्रत नेणारे असीम चे काश्मीर मधील  काम संगणक प्रशिक्षण केंद्र विज्ञान विषयासाठीचे वाचनालय ,युवा गट , विविध स्पर्धा, शिबिरे अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर गेली १० वर्षे चालूं आहे.  
     याचाच एक भाग म्हणून 'अमन संध्या' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर बद्दल ची वर्षानुवर्षे जपण्यात आलेली गृहीतके बाजूला ठेऊन तेथील वास्तवा बद्दल जाणून घेण्यासाठी आणि जम्मू काश्मीर साठी आशेची पणती पेटवण्यासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
     आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून  असीम च्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवावे, ही विनंती. ( हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, नि:शुल्क आहे. )

 स्नेहांकित 
स्मिता चावरे.