स्वातंत्र्यदिन आला पण सुराज्य कोठे आहे

उद्या स्वातंत्र्यदिन  आपण साजरा करू पण सुराज्य कोठे आहे?

रोज वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या पाहिल्या की वाटते सुराज्य कोठे आहे, एवढेच नव्हे तर माणुसकीला काळिमा लावणाऱ्या गोष्टी ऐकल्या की वाटते आपण आता पुन्हा स्वातंत्र्या ऐवजी पारतंत्र्यातच चाललो की काय? 

आपण लोकशाही निवडली त्या सुमारास सर्वत्र राजेशाहीत राजा कसा वागतो म्हणून एका राजाचे उदाहरण दिलेले असे रोम जळत होते व राजा करमणुकीसाठी वाजवत बसला होता आज आमचे नेमके तसेच लोकप्रतिनिधीपैकी काहीचे असेच वक्तव्य केल्याची बातमी आली होती. यामुळे  वाटते लोकनेते म्हणून निवडून आलेले नेते स्वतःला राजे समजू लागत असावेत.

म्हणूनच महागाई संदर्भात प्रश्नोत्तराच्या वेळी समाधानकारक उत्तर न देता बगल दिली असावी असे वाटले