शिक्षणाबाबत थोडसं.............

"शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे".मात्र हा तिसरा डोळा उघडण्याची मुभा या समाज व्यवस्थेने पूर्वापार नाकारलेली आहे असे दिसते . या साठी विविध स्वरूपच्या आख्यायिका सांगितल्या जातात  त्यापैकी एक तिसरा डोळा हि संकल्पना  शिव म्हणजेच शंकराच्या बाबतीत सांगितली जाते.व पुढे असेही सांगितले जाते ,की जर शिवाने आपला तिसरा डोळा उघडला तर या पथ्वीतलावर प्रलय येईल .पण विचार करण्यासारखी बाब हि की शंकर हा आपला तिसरा डोळा केव्हा उघडतो ज्यावेळी कुठे अन्याय होतोय असे पाहिल्यावर अतीक्रोधित होऊन तो धरणी नष्ट करण्यासाठी नसून त्यावर होणारा अन्याय नष्ट करण्यासाठी बरोबर ना.मग जर शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असेल तर ज्यांना ज्यांना हा तिसरा डोळा उघडता आला अशा महामानवांनी या पथ्वीवर क्रांती घडवून आणल्याची उदाहरणे आपल्या समोर आहेत.भारतात सुद्धा याची भरपूर उदाहरणे सापडतात.

मग पूर्वापार चालत आलेल्या या शिक्षण व्यवस्थेतून अशी माणसं का घडतं नाहीत."मी अंधपणे हा विचार मांडतं नसून फार विचाराअंती मला पाडलेला प्रश्न  मांडतो आहे", आत्ताच्या काळात शिक्षणाने हा तिसरा डोळा बहाल केला आहे असे महामानव आहेत तरी कुठं या बाबतीत कदाचित तत्ववेत्त्यांची मते वेगवेगळी असतील. मात्र या समाजात रूढ असलेली शिक्षण पद्धत याला जबाबदार असावी , इंग्रजांचे धोरण शिक्षण हक्काने द्यायचे मात्र यातून आपणाला आवश्यक असणारे कारकून कसे तयार होतील हे पाहायचं तीच  प्रणाली आजही आहे. स्पर्धा लावून शिक्षण दिलं अथवा घेतलं जातंय. स्पर्धेमुळे खरंच का ज्ञान मिळतं. आज १ ली पासून जी स्पर्धा सुरू होते ती शिक्षण पूर्णं होई पर्यंत आणि नंतर हा समाजच सांगतो हे जीवन म्हणजे सुद्धा एक स्पर्धाच आहे.यात दुसऱ्याला मागे टाकल्या शिवाय पुढे जाता येत नाही. इतिहास साक्षी आहे की या आपल्या देशात ज्यांना ज्यांना शिक्षणाने ज्ञान प्राप्ती झाली अशाच माणसांनी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले.हेतू हाच ठेवला की या मानवजाती मध्ये एकता,समानता,बंधुता,प्रेम व शांतता नांदावी.त्यांना सुखाने निर्भयपणे आपले जीवन जगता यावे . मग शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडूनही आज या विचारांच्या माणसांची समाजात कमतरता का ?