सप्टेंबर १२ २०११

२१ शिट्यांचे लिंबाचे लोणचे

जिन्नस

  • २५लिंबे
  • १ किलो साखर
  • १ वाटी मीठ
  • हवे असल्यास लिंबू लोणचे मसाला पाकिट

मार्गदर्शन

रात्री २५ लिंबे स्वच्छ धूवून पुसून कोरडी करून ठेवावीत. सकाळी प्रत्येक लिंबाच्या आठ फोडी कराव्यात. काळजीपूर्वक सर्व बिया काढून टाकाव्यात. त्यानंतर फोडी एका स्टीलच्या डब्यात ठेवाव्यात. कुकरमध्ये खाली भरपूर पाणी घालून त्यात हा डबा ठेवावा.
कुकरच्या २१ शिट्या कराव्यात. पूर्ण गार झाल्यावर त्यात एक वाटी मीठ व एक किलो साखर मिसळावी. उत्तम मुरलेले उपवासाचे गोड लोणचे खायला तयार.
उपवासाव्यतिरिक्त हवे असल्यास एक पाकिट लिंबू लोणचे मसाला पाकिट घातल्यास आणखी चविष्ट लागते.

टीपा

लोणचे मुरून खायला तयार होण्याचा कालावधी यात वाचतो.
तूप मेतकूट भात, उपमा, शिरा याबरोबर मस्त.

माहितीचा स्रोत

सौ. काकू

Post to Feedअसे का?
असे काही नाही.
मुरण्याची प्रोसेस!
छान लागते
पण

Typing help hide