''अनोळखी ''

'' अनोळखी''
आरश्यामधून कोण हासतो अनोळखी?
आजकाल मी मलाच भासतो अनोळखी
वाटतो 'हवा' कधी नको नको कधी कधी
माझिया तनूत 'मी' निवासतो अनोळखी
ह्या कलीयुगी स्वभाव जाहलाय नाटकी
चेहर्‍यास रंग मीच फासतो अनोळखी
भावना अलिप्त ठेवतो कधी कधीच मी
आपल्यास होवुनी तपासतो अनोळखी
राहतो मवाळ घाबरून मी जगास ह्या
आणि बंदुकीत गोळि ठासतो अनोळखी
-- डॉ .कैलास गायकवाड