उपवासाची आमटी

  • १ वाटी भाजलेले शेंगदाणे
  • ३ ते ४ अमसुले
  • २ मिरच्या
  • १ चमचा जीरे
  • १ मोठा चमचा तुप
  • मीठ ,गुळ चवीनुसार
  • कोथींबीर
१० मिनिटे
४ ते ५ लोकांसाठी

मीक्सरमध्ये दाणे , अमसुल ,मिरच्या, थोडे जीरे बारीक करून घ्यावे.

भांड्यात तुप गरम करून त्यात उरलेले जीरे घालावे व तडतडल्यावर थोडे पाणी घालावे.
व नंतर त्यात मिक्सर मधील सर्व मिश्रण घालावे. उकळल्यावर चवीनुसार मीठ व गुळ घालावा.
चालत असेल तर कोथींबीर घालावी.

मिक्सर मध्ये वाटल्यामुळे  दाणे , अमसुल  कमी लागते व चव देखील छान येते.