खीच्चे ( तांदळाचे पापड )

  • तांदळाचे पीठ १ भांडे
  • पापडखार अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • आवडीनुसार
  • जीरे भरडसर कुटुन १ चमचा
  • पाणी १ भांडे
२० मिनिटे
२० ते २२ पापड

प्रथम १ भांडे पाणी उकळण्यास ठेवावें

नंतर त्यात  पापडखार, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखट ,मीठ  व जीरे घालावे.
पाणी उकळल्यावर तांदळाचे पीठ घालून ढवळावे व झाकण ठेवून २ मिनिटे गॅस बारीक करावा.
नंतर भांडे उतरवून २ ते ३ मिनिटे तसेच राहू द्यावे
शिजलेला गोळा, पाणी व तेलाच्या हाताने व्यवस्थीत मळून घ्यावा. पाहिजे तर फुड प्रोसेसर मध्ये मळावा म्हणजे हात भाजणार नाहीत.
आता त्याच्या छोट्या छोट्या लाट्या कराव्यात व पीठावर कींवा तेलावर पापड लाटावेत.

लाट्या  छोट्या  कराव्यात कारण हा पापड तळल्यावर खुप फुलतो.