मुळ्याच्या पानांची भाजी------

  • एका मुळ्याची पाने, हरबरा डाळ अर्धी वाटी,
  • फोडणीचे साहित्य,
  • दोन चमचे तेल
  • लाल तिखट एक छोटा चमचा
  • चवीनुसार मिठ
१५ मिनिटे
तीन लोक

आज सकाळी मंडईत गेले होते, तेथे पांढरेशुभ्र मुळे दिसले, घ्यायचा मोह झालाच, कोशिंबीर होइल एक वेळची,
एक मुळा घेतला, तो घेताना भाजीवाला म्हणाला- मागील पाला काढून टाकू का -
म्हटले अरे नको (मनात- भाजी करुयात आज मस्त- आणी नवर्याला ओळखायला
लावुयात,), घेउन आले मुळा घरी, त्याचा पाला काढून स्वच्छ धुतला, बारीक
चिरुन ठेवला, तोपर्यंत हरबरा डाळ भिजत घातली,
अर्ध्या तासाने डाळ चांगली भिजल्यावर कढइ मध्ये जिरे-मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी केली,
त्यात भिजलेली डाळ घातली चांगली परतुन घेतली, मग चिरुन ठेवलेली मुळ्याची
पाने त्यात घातली, तिखट व चवीनुसार मिठ घातले पुन्हा परतले व वाफ
येण्यासाठी त्यावर झाकण ठेवले, पाच-सात मिनिटे चांगली वाफ येउ दिली,
त्यातील डाळ शिजल्यावर भा़जी झाली समजावे. पाणी अज्जिबात घालू नये.
ही भाजी केली , ह्यांच्या ताटात वाढ्ली, म्हटले ओळखा पाहू- कशाची भाजी आहे, नाही ओळखली तर
मला आईसक्रिम द्यावे लागेल, बरीच नावे घेतली, पण नाहीच ओळखली.....
आणी त्याबद्दल मला आत्ताच आईसक्रिम आणून दिले आहे, ते खात खात हा पदार्थ दिला आहे
आपणा सर्वांसाठी---

तयार भाजी ही पहा------


पाने  चांगली  धुवून घ्यावित,

डाळ  चांगली भिजलेली असली पाहिजे.

आईकडून