सांबार मसाला

  • १ टेबल स्पून हरभरा डाळ
  • १ टेबल स्पून उडीद डाळ
  • १ टेबल स्पून धणे
  • अर्धा टेबल स्पून जीरे
  • पाव टेबल स्पून मेथ्या
  • ५ ते ६ लाल मिरच्या
१० मिनिटे
१० ते १२

सर्व जिन्नस वेगवेगळे खरपुस भाजून घेणे.

मीक्सर मध्ये एकत्र वाटून घेणे.
सांबार मसाला तयार.

सांबार करताना फोडणीत हिंग जरा जास्त घालावा. हल्ली कडीपत्ता ताजा मिळतो , नाहीतर मसाला करताना वाटीभर पाने तळून घालावीत.

सांबार मसाला पाण्यात कालवून घालावा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.