शिळ्या वरणाची पाव भाजी

  • रात्रिचे किंवा सकाळचे उरलेले शिळ वरण
  • सिमला मिर्ची २ बारिक कापलेली
  • कडीपत्ता ४ ते ५ पाने
  • १ कांदा बारिक चिरून
  • १ टोमेटो बारीक चिरुन
  • २ सिमला मिरच्या बारीक चॊकोनी चिरुन
  • १/२ चमचा हळद, तिखट १ चमचा, पावभाजी मसाला २ ते ४ चमचे
  • १/२ चमचा काळे मिठ
  • कोथिंबीर बारिक चिरलेली थोडी
  • लसुण घालून केलेलि लाल मिरची पेस्ट १ चमचा
  • पावभाजी पाव लादि
  • गरम पाणी
  • अमुल बटर, तेल
१५ मिनिटे
  1. कडई मध्ये तेल आणी अमूल बटर एकत्र गरम करा. त्यात जिरे टाकून तडतडवा, कडिपता थोडा, दुखावलेला लसूण पाकळ्या, कापलेला कांदा एका पाठोपाठ एक टाकून कांदा गुलाबीसर होइसतोपर्यंत परतवा.
  2. आता कापलेला टोमॅटो टाकून मऊ करा.
  3. थोडी चिरलेली कोथिंबीर टाका.
  4. लाल मिरची व लसुणाची पेस्ट घाला.
  5. हळद व तिखट आवडी नुसार कमी जास्त घालू शकता.
  6. आता पावभाजी मसाला घाला.
  7. मग चिरलेली सिमला मिरची  घालून परता १/२ मिनिटे परता
  8. काळे मीठ घाला.
  9. थोडे पाणी घाला जेणे करून मसाला जळणार नाही.
  10. आता मुठिभर फ्रोजन किंवा उकडलेले मटार घाला.
  11. जरासं परतून त्यात उरलेली शिळी डाळ घालून उकळी येऊ द्या.
  12. आता जरा गरम पाणी घाला उकळी आली की झाली पाव भाजी तैयार.


 

पाव मध्ये कापून तव्या वर अमूल बटर मध्ये पावभाजी मसाला टाकून भाजून घ्या आणि गरमा गरम वाढा. कांदा व लिंबू बरोबर.

  • शिळ्या वरणाचा असाही मस्त बेत करता येतो...
  • तिखट तुम्हाला हवे तसे कमी जास्त घालू शकता.
  • बटाटे घालायची आवश्यकता नाही.. वरणा मुळे भाजीला दाट पणा येतो.
  • वरण घट्ट असल्यास उत्तम. 
  • पाणी कमी जास्त भाजी पातळ वा घट्टसर हवी तसे वापरा.



मी स्वतः