तिळाच्या वड्या ---

  • - तिळ दोन वाट्या व शेंगदाणे एक वाटी ,
  • गूळ बारीक चिरलेला अडीच वाट्या,
  • साजुक तुप दोन चमचे.
३० मिनिटे
पंचवीस , तीस लोक

पुर्वतयारी -- - तिळ व शेंगदाणे खमंग भाजुन घ्या व त्याचे कूट करुन ठेवा.
किचन ओटा स्वच्छ पूसून ठेवा.

कॄती --- कढईत गूळ व तूप एकत्र करुन पाक करायला ठेवा. गुळ विरघळ ला की थोडे थोडे बुडबुडे येउ
लागतील, लगेच त्यात तिळ व शेंगदाणे कुट घालायला सुरुवात करा, एका हाताने मिश्रण हलवत रहा,
त्याचा गोळा होऊ लागेल, तो गोळा किचन ओट्यावर घ्या, भराभरा थापत रहा, हात
भाजत असेल तर प्लॅस्टीक कागद घ्या व थापत रहा, नंतर लाटण्याने एकसारख्या
लाटा, व लगेचच वड्या पाडा,
कारण गार झाल्यावर वड्या पडत नाहीत.
झाल्या वड्या तय्यार....

ह्या घ्या वड्या
आणी
तिळगूळ घ्या गोड गोड बोला


तिळ व शेंगदाणे खमंग भाजुन घ्या म्हणजे वड्या खमंग होतिल.

आईकडून