पेरुचा मेथांबा

  • पेरु- ३ मध्यम आकाराचे, दळदार, फार जास्त पिकलेले नकोत, एकदम कर्रेही नकोत
  • मेथीदाणे - अर्धा चमचा, मिरी - ५-६ दाणे, लाल सुक्या मिरच्या- २-३, लवंगा- २
  • गूळ- १ कप - चिरुन, फोडणीचे साहित्य
१० मिनिटे
३-४ जण

पेरुच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्या. जाड बुडाच्या पातेलीत खमंग फोडणी करून तीत मेथ्या, मिरी आदी जिन्नस टाकून फोडी घालाव्या. मीठ, अर्धा चमचा लाल तिखट घालून चांगले हलवून घ्यावे व वाफ येऊ द्यावी. (गरज वाटल्यास अर्धा कप पाणी घालून हलवावे- त्याने जरा सरसरीत होईल). नंतर गूळ घालून ढवळावे व परत एक वाफ काढावी. गूळ पाकावर आला पाहीजे. फोडी बोटचेप्या शिजवाव्या... फार लगदा होऊ देऊ नये.  

गरम पोळी, सुक्या बटाट्याची भाजी, केळीचे शिकरण व पेरुचा मेथांबा - असा सुटसुटीत मेनू ठेवावा..... 

:-)

आई