खरपूस खारी पट्टी

  • १ वाटी मैदा
  • अर्धी वाटी डाळीचे पीठ
  • पाव वाटी तांदुळाचे पीठ
  • चार चमचे तेल (मोहन )
  • मीठ चवीनुसार
  • तीळ २ चमचे
  • मीरे व ओवा प्रत्येकी १ चमचा ( भरड )
  • तेल तळण्यासाठी
३० मिनिटे
१०

तळण्यासाठीचे  तेल सोडून ,सर्व जिन्नस  एकत्र करावेत व गार पाण्याने  घट्टसर मळावे.

१५ ते २० मीनीटानंतर  त्याचे छोटे छोटे  गोळे करावेत.

पातळसर  लाटून पट्ट्या किंवा हव्या त्या आकारात ( गोल , शंकरपाळे इ. )

कापाव्यात.
  मध्यम  आचेवर खरपूस  तळाव्यात.

)

  दुपारी  चहाबरोबर   खायला छान  लागतात.
(  बिस्कीटांना  पर्याय.)