चकोल्या

  • शिजवलेली तुरडाळ १ वाटी
  • १ चमचा गोडा मसाला
  • चिंचेचा कोळ , तिखट , मीठ,गुळ चवीनुसार
  • २ भांडे कणीक ,२ चमचे बेसन पीठ
३० मिनिटे
४ ते ५

तुरीच्या डाळीची  आमटी  करून घ्यावी  (पातळसर ).त्यात चिंचेचा कोळ , तिखट , मीठ,गुळ   गोडा मसाला टाकावा.
 
कणकेत  डाळीचे  पीठ , मीठ , थोडे  मोहन टाकून  घट्ट मळून  घ्यावी.
आमटी उकळल्यावर  त्यात कणकेची पोळी लाटून , त्याचे शंकरपाळ्याच्या आकारात तुकडे करून सोडावेत.

शिजत आल्यावर  तुकड्यांचा रंग  बदलतो.

   गरम गरम चकोल्या  साजुक तुप व लिंबाच्या  फोडीबरोबर  खायला द्याव्यात.

आमच्याकडे  खाताना यावर भरपुर लसुण घातलेली  फोडनी घेतात.

           चवीत  बदल म्हणून  आमटी  ऐवजी  जीरे खोबरे  घालून वरणातील  चकोल्या देखील  करतात. पण  तुप व लिंबू  हवेच.

(  आमटी उकळल्याशिवाय  तुकडे  टाकू नयेत .)