शब्द

शब्द

शब्द शब्द जपून ठेवा ,  शब्द शब्द समजून द्या

शब्द शब्द उमजून घ्या, शब्द शब्द जपून ठेवा  । ।

शब्द हीच अमुची शक्ती, शब्दांवरच अमुची भक्ती

शब्द अमुचे वैभव, शब्द अमुची संपत्ती । ।

शब्द म्हणजे नाद, शब्द म्हणजे संवाद

शब्द हेची संगीत, शब्दची घडविती वाद । ।

शब्द अमुचा श्वास, शब्दातुनी निः श्वास ।

शब्द हाची भास, शब्दांचाच आम्हा ध्यास । ।

शब्द अमुचा अभिमान, शब्द करितो गुणगान ।

शब्द अमुचा प्राण, परी नि: शब्दांनाही देतो मान ॥