विवाह नोंदणी प्रमाणपत्र -- शंका !!

नमस्कार मनोगती,

चांगलेच रस्ते पुन्हा खणून डांबरीकरण का करतात...पाणी बचत करा असे ओरडणारा पालिकेच्या रिक्षेचा भोंगा मनपाभवनाच्या आवारात एकदा तरी का फिरत नाही.. (कारण तिथलेच नळ तोट्या नसल्याकारणाने वाहत असतात)...रेशनिंग कार्ड (शिधापत्रक) वर ठसठशीत 'ह्या कार्डाचा वापर केवळ आणि केवळ रेशन मिळण्यासाठी करावा" लिहिलेले असूनही रहिवासाचा पुरवा म्हणून सगळीकडे रेशन कार्ड का मागतात... असे एक ना अनेक प्रश्न पडत असतात.. आणि मग स्वसमजूतीसाठी आम्ही मानतो  एकूणच आम्हाला पालिका कारभार  ओ की ठो समजत नाही  ,!!

असो, परंतु आज मॅरेज रजिस्ट्रेशन ला उत्साहात जाऊन, प्रमाणपत्र हाती आल्यावर ते पाहून अत्यंत उदास मनाने परत आलो... त्याबद्दलच्या काही शंका,

१) मला मिळालेली मूळ प्रत - कृष्ण-धवल (ब्लॅक & व्हाईट) आहे ! ---  मला रंगीत अपेक्षित होती...

२) प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीवरील (अर्जंट तिथेच काढलेले) फोटो सुद्धा कृष्ण-धवल (ब्लॅक & व्हाईट) आहेत -- आपण पालिका किंवा कोणत्याही सरकारी दस्तावेजाला 'ब्लॅक & व्हाईट' दिलेले फोटो स्वीकार होत नाहीत... उलट तिथे अजून कायदे असतात की निळी किंवा लालच बॅकग्राऊंड पाहिजे वगैरे --- मग आम्हाला मिळणाऱ्या प्रमाणपत्राबाबत ही उदासीनता का ?

मनोगतींपैकी कोणाला माहीत असेल तर कृपया कळवा...

३) रंगीत सॉफ्ट कॉपी / प्रिंट प्रमाणपत्र मिळू शकते काय? आणि त्यासाठीची अर्ज पद्धती वगैरे ?

--

आशुतोष दीक्षित.